बेस्ट कामगार आक्रमक; ड्युटी शेड्युलमध्ये बदल न झाल्यास बहिष्कारावर ठाम

162

जाचक ड्युट्यांचे शेड्युल, चुकीचे काम वाटप अधिकाऱ्यांची मनमानी, तसेच ज्येष्ठ कामगारांचा विचार न करता रुट जॉईन करून डुट्या वाढवणे यांसदर्भात गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कामगांरामध्ये प्रचंड असंतोष आहे. कर्मचाऱ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी ज्येष्ठ बेस्ट कमिटी सदस्य सुनिल गणाचार्य तसेच अन्य बेस्ट कामगार पदाधिकारी व संघटनांनी वाहतूक विभागाचे उपमहाव्यस्थापक शेट्टी यांची भेट घेतली.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपचे सोमवारी ‘चलो बेस्ट भवन’!)

…तर ड्युटी शेड्युलवर बहिष्कार कायम

यावेळी प्रशासनाने आम्ही यात बदल करू अशा सूचना दिल्या यावर गणाचार्यांनी या सर्व सूचना तोंडी न देता आगार व्यवस्थापकांना लिखित स्वरूपात देण्याविषयी किंवा या ड्युट्या शेड्युल स्थगित करून महिन्याभरात यात बदल करण्याची मागणी केली. यावर एका ड्युटीसाठी संपूर्ण शेड्युल विस्कळीत होईल असे प्रशासनाने सांगितले. परंतु आम्ही याला बळी पडलो नाही असे गणाचार्यांनी स्पष्ट केले. यावर २७ जुलै पर्यंत जर या संदर्भात कामगारांचा विचार करून निर्णय घेतला नाही, लेखी सूचना दिल्या नाहीत तर या ड्युट्यांवरील बहिष्कार कायम राहिल असे सुनिल गणाचार्यांनी स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : BKC प्रवाशांचं ‘बेस्ट’ प्रशासनाला साकडं! बसच्या वाढीव फेऱ्यांची मागणी  )

या ड्युट्या शेड्युलमध्ये बदल करून जर सुधारणा केल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी यावरील आपला बहिष्कार कायम ठेवावा असे आवाहन सर्व आगारातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.