बेस्ट कामगार युनियनच्या २९ एप्रिल रोजी झालेल्या मासिक बैठकीत ऑनड्युटी म्हणजेच कर्तव्यावर असताना अपघात झालेल्या कर्मचाऱ्याला मासिक पगार न दिल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. यानंतर व्यवस्थापन आणि बेस्ट कामगार युनियन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ज्याला बेस्ट समितीने आपल्या ठराव क्रमांक ५७ द्वारे मंजुरी दिली आहे अशा ड्युटीवर असताना अपघात झालेल्या कर्मचाऱ्याला मासिक वेतन दिले जाईल असे निर्देश बैठकी दरम्यान देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्तव्यावर असताना अपघात झालेल्या कर्मचाऱ्याला तो त्याची ड्युटी पुन्हा सुरू करेपर्यंत नियमित मासिक पगार दिला जाणार आहे.
( हेही वाचा : Indian Post मध्ये काम करण्याची संधी… ३०२६ पदांची भरती, शेवटचे दोन दिवस बाकी)
नियमित पगार मिळणार
तसेच अपघात झाल्यावर सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, मासिक पगारातून नुकसान भरपाई करण्यात येईल. या बैठकीदरम्यान दादर कार्यशाळेतील सर्व आगार अधिकाऱ्यांना ड्युटीवर असताना अपघात झालेल्या सर्व कर्मचार्यांचे तपशील बेस्ट उपक्रमाला कळवावी यापुढे EOT कार्यालयात अपघात संदर्भात तक्रारींची नोंद करण्यात येईल अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community