‘बेस्ट’च्या अक्षय चैतन्य आहारावर कामगार नाराज; उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल

125

बेस्टमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकस आहार मिळावा यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘अक्षय चैतन्य’ योजना सुरु केली असून बेस्टच्या १३ आगारांमधील उपहारगृहांमध्ये टचस्टोन फाऊंडेशनच्यावतीने १८ रुपयांमध्ये नाश्ता आणि ३५ रुपयांमध्ये जेवण पुरवले जात आहे. यासाठी बेस्टच्या १२ आगारातील उपहार गृह बंद करून बेस्ट आणि टच स्टोन फाऊंडेशनच्या मदतीने ही योजना राबवली जात आहे. परंतु याबाबत बेस्ट कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. याविरोधात आता बेस्ट कामगार संघटना आक्रमक झाल्या असून भोजनाची पूर्वीप्रमाणे सोय न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला आहे.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

बेस्ट उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल 

यासंदर्भात सध्या समाजमाध्यमांवर बेस्टच्या आगारातील उपहारगृहांमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यानंतर उपहारगृहांमध्ये सध्या उंदरांचे दिवस सुरू झाल्याचे प्रतिक्षा नगर आगारमध्ये पहायला मिळाले असा आरोप सुनील गणाचार्यांनी केला आहे. कुर्ला, वडाळा, वरळी, प्रतिक्षा नगर, कुलाबा या ठिकाणी या योजना सुरू झाल्या मात्र यांना काही दिवसांतच या उपहागृहाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. बेस्टची उपहारगृहे बंद करून त्याची सुमारे ३५ हजार चौरस फुटाची जागा नेमकी कोणाच्या घशात घालायची आहे असा सवाल गणाचार्यांनी विचारला आहे.

बेस्ट कामगारांना योग्य आणि सकस आहार मिळण्यासाठी भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल. बेस्ट संघटना आक्रमक झाल्या असून पूर्वीप्रमाणे भोजनाची सोय करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.