‘बेस्ट’ कामगार झाले संतप्त; उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल

बेस्टमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकस आहार मिळावा यासाठी बेस्टने ‘अक्षय चैतन्य’ योजना सुरु केली आहे. परंतु या योजनेवर बेस्ट कर्मचारी वर्ग नाराज आहे. कॅंटिंगमधील अस्वच्छता, आकारले जाणारे जास्तीचे पैसे, अपुऱ्या नियोजनाअभावी ही कंत्राटी तत्वावर चालवली जाणारी ही योजना बंद करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या यासंदर्भात वरळी आगारातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ प्रवाशांना दिलासा; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे )

कंत्राटी योजना बंद करण्याची मागणी

या नव्या योजनेमुळे बेस्ट उपक्रमातील जुनी कॅंटिंग सुविधा बंद करण्यात आली. बेस्टची उपहारगृह २४ तास सुरु असायची. पण अक्षय चैतन्य योजनेतंर्गत सकाळी व दुपारी ठराविक वेळेतच हा आहार मिळणार असून पहाटे चार वाजता ड्युटीवर येणारा कर्मचारी व रात्रभर सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सेवा मिळणार नाही. या कॅंटिंगमध्ये प्रचंड अस्वच्छता असून साफसफाई करण्यासाठी केवळ दोन कामगार आहेत त्यामुळे याठिकाणी कसे खायचे असा सवाल भाजप कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आनंदा जरग यांनी केला आहे. तसेच ही कंत्राटी योजना बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कामगारांच्या आरोग्याशी खेळ

कुर्ला, वडाळा, वरळी, प्रतिक्षा नगर, कुलाबा या ठिकाणी या योजना सुरू झाल्या मात्र यांना काही दिवसांतच या उपहागृहाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. प्रशासनाने अतिशय आत्मघातकी निर्णय घेतला असून, बेस्टच्या सर्व प्रथा, नियम बाजूला सारत हा निर्णय घेतल्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे. या कंत्राटदारांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. हे कंत्राटदार कामगारांच्या आरोग्याशी खेळत आहेत. पूर्वीच्या पद्धतीनुसार पुन्हा सर्व सुविध जनरल मॅनेजरने कामगारांना देणे गरजेचे आहे, असे सुनील गणाचार्य यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here