वरळी आगार ‘बेस्ट’ नाही; गैरसोयीमुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होताहेत वाद

वाहकांचा तुटवडा, दुर्दशा झालेल्या गाड्या यामुळे प्रवाशांची गैरसोय होतच आहे, शिवाय मुंबईतील वरळी आगाराला अनेक समस्यांनी घेरले आहे. वाहकांचा तुटवडा असल्याने गाड्या कशा सोडायच्या असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. यातून बेस्ट प्रशासनाने याबाबत मार्ग काढण्याची आवश्यकता असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

( हेही वाचा : BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! रोहित नाही, आता ‘या’ खेळाडूला करा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचे स्पष्ट मत )

वाहक प्रवासी वाद

वरळी आगारात ज्या मार्गावर पूर्वी ८ ते ९ गाड्या धावायच्या त्या मार्गावर आता फक्त ३ ते ४ बसगाड्या धावत आहेत. बेस्ट प्रशासनाकडून सुरु असलेल्या कंत्राटी सेवेमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वरळी आगार ते कुलाबा बस स्थानक मार्गावर धावणाऱ्या १२४ या बसचे वाहक उशीरा येत असल्याने या मार्गावर पूर्ण क्षमतेहून अधिक प्रवासी संख्या घेऊन धावतात. त्यामुळे वाहक चालकांसोबत प्रवासी वाद घातल्याचे दिसून येत आहे.

बेस्टच्या जुन्या बेस्टच्या ताफ्यातील गाड्यांचे आयुर्मान संपत आले आहे. क्यामुळे गाड्या स्क्रॅपला जात आहेत. वाहक रिटायर्ड होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत तसेच काही गाड्या शाळेसाठी सुद्धा द्याव्या लागतात अशी माहिती वरळीचे डेपो मॅनेजर अरूण पवार यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

दरम्यान, बेस्टच्या ताफ्यात आता लवकरच नव्या बसेस दाखल होऊन प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. यामुळे मुंबईत बसेसची वारंवारता वाढेल आणि प्रवाशांना वेळेत सुविधा मिळण्यास मदत होईल. परंतु या नव्या बसेस ताफ्यात येण्यापूर्वी कर्मचारी वर्गाकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here