बेस्ट उपक्रमातील विद्युत पुरवठा विभागातील बिल वितरण करणारे कर्मचारी राजेश काशीराम शिंदे सोमवारी कामावर कार्यरत असताना खाली कोसळले व जागीच त्यांचा मृत्यू झाला. शिंदे जेव्हा खाली पडले तेव्हा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी लगेच त्यांना जी टी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
हृदय विकाराचा झटका
मिळालेल्या माहितीनुसार राजेश काशीराम शिंदे यांना सोमवारी दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान बिल वितरीत करत असताना हृदय विकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या बेस्ट उपक्रमात विद्युत पुरवठा विभागांत गेल्या तीन चार वर्षांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळेच कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. विद्युत पुरवठा विभागांत बाह्य विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाची तरी भरती करणे गरजेचे आहे असे वारंवार सर्व युनियन मागणी करीत आहेत परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
Join Our WhatsApp Community