जगभरात सोशल मिडीया अॅप्लिकेशमधील व्हॉट्सअप हे अॅप्लिकेशन सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. काळानुसार, व्हॉट्सअप युजर्सना नवीन अपडेट देत असते. त्यामुळे चॅटिंगच्या पद्धतीतही बदल होताना दिसत आहेत. असे असताना व्हॉट्सअप हॅक करणे थोडेसे अवघड आहे. मात्र अशा काही पद्धती आहेत, ज्या अगदी बेसिक असून कोणीही चुकीच्या हेतूने आपल्या विरुद्ध वापरू शकेल. हॅकर्स व्हॉट्सअप हॅक करण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढत असतात. तुम्हाला यापासून बचाव करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
(हेही वाचा – तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढलाय का? अन्यथा….)
सध्या हॅकर्स व्हॉट्सअॅप युजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल करतात. यावर हॅकर्स स्वत: एक ब्रॉडबँड, केबल मेकॅनिक किंवा अभियंता असल्याचे युजर्सना सांगतात. तसेच अनेक वेळा हॅकर्स स्वतः टेलिकॉम ऑपरेटरच्या प्रतिनिधी असल्याचेही सांगतो आणि आपल्या जाळ्यात ओढतो. अनोळखी नंबरवरून हॅकरने कॉल केला असता, तो तुमचे कनेक्शन डिस्कनेक्ट झाल्याचे सांगून ते टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर 401* हा नंबर डायल करायला सांगतात. हा नंबर डायल केल्यानंतर हॅकर्स तुमचे व्हॉट्सअॅप हॅक करण्यास सुरूवात करतो.
असे होते व्हॉट्सअप हॅक
हॅकर्सने युजर्सना सांगितलेला 401* हा कॉल डायव्हर्टचा कोड आहे. त्यामुळे हॅकर्स त्यांच्या मोबाईल नंबरवर डायल करण्यास सांगतात. तो नंबर डायल केल्यावर, युजर्सचा कॉल स्कॅमरच्या मोबाईलवर ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर कॉलवर व्हॉट्सअॅपवरून नवीन ओटीपीची मागणी हॅकर्स कडून केली जाते. यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट ते त्यांच्या फोनमध्ये लॉग इन करतात. यानंतर हॅकर्स वारंवार युजर्सकडून वारंवार पैशांची मागणी करत फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.