अलर्ट! Online गेम खेळताय, बँक खाते सांभाळा

98

सध्या सगळे आयुष्य डिजीटल झाल्याने प्रत्येकाच्या हातात तुम्हाला फोन पाहायला मिळेल. त्या गेल्या वर्षी कोरोनाने थैमान घातले आणि जनता घरात बंदिस्त झाली. त्यामुळे वेळ कसा घालवावा, यासाठी मोबाईलवर अनेक उपयोगी गोष्टी काहीं लोकांनी शिकून घेतल्या तर लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून ऑनलाइन गेम खेळण्याकडे कल वाढला. सर्व सुरूळीत होत चाललं असतानाही ऑनलाइन गेम मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. लॉकडाऊनदरम्यान, शिक्षणही ऑनलाइन असल्याने घरोघरी मुलांच्या हातात मोबाइल दिसू लागले. त्यामुळे या मुलांचा कल मोबाइल गेम खेळण्याकडे दिसू लागला.

यामध्ये सध्या ८ ते ९ वयोगटातील मुला-मुलींनाही ऑनलाइन गेमने आपल्या जाळ्यात ओढले. ऑनलाइन गेम हे ग्राफिकल आकर्षक आणि लक्षवेधी ठरणारे आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ऑनलाइन गेमच्या नावाखाली मुलांचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

८ ते ९ वयोगटातील मुला-मुलींनाही पालकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक माहिती असतो. ते अनेकदा याचा वापरही करताना दिसतात. गेमच्या अनेक लेव्हल पार करत ही मुलं गेम खरेदीसाठी या कार्ड्सची गोपनीय माहितीचा गैरवापर करतात, त्यामुळे पालकांच्या खिशाला फटका बसू शकतो, बँकेचे खाते रिकामे होऊ शकते. अशा ऑनलाइन गेमिंगपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर विभागाकडून वारंवार केले जात आहे.

काय खबरदारी घ्यावी…

  • लहान मुले, किशोरवयीन मुलांनी कोणत्याही ऑनलाइन गेमच्या लेव्हल खरेदी करण्यापूर्वी पालकांचा सल्ला घ्यावा.
  • आपल्या पालकाच्या आणि मोबाइलच्या आधीच्या परवानगीशिवाय त्यांचा गेम सुरू करू नका. आपण खेळत असलेला गेम सुरक्षित आहे. की नाही, याची खात्री करा.
  • पालकानी मुले कोणते गेम खेळत आहे. याबाबत सतर्क राहा.
  • मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मोबाइल किवा ऑफिस मोबाइल लॅपटॉप किवा इतर कोणतेही डिव्हाईस देण्याचे टाळा.

गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नका….

  1. आपल्या मुलांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस देण्यापूर्वी त्यात आपला बँक तपशील नाही, याची खात्री करून घ्या.
  2. आपला आर्थिक डाटा बँक खाते तपशील डेबिट-क्रेडिट कार्ड पिन क्रमांक मुलांपासून दूर ठेवा आणि त्यांना याची माहिती देऊ नका.
  3. आपल्या मुलाना बाहेर खेळायला पाठवा. आधी वास्तविक जगात नंतर ऑनलाइन गेमिंग जगात त्यांना जगायला शिकवा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.