सुखदेव थापर (Sukhdev Thapar) हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारच्या विरोधात लढा दिला. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. २३ मार्च १९३१ या दिवशी भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांच्यासोबत त्यांनाही फासावर चढवण्यात आलं होतं. (Sukhdev Thapar)
सुखदेव थापर (Sukhdev Thapar) यांचा जन्म १५ मे १९०७ साली लुधियाना येथे हिंदू समाजातल्या पंजाबी खत्री कुटुंबात झाला. त्यावेळी भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. सुखदेव थापर यांच्या वडिलांचं नाव रामलाल थापर असं होतं. त्यांच्या आईचं नाव रल्ली देवी असं होतं. सुखदेव थापर यांचे वडील लहानपणीच गेले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. त्यांच्या काकांचं नाव लाला अचिंतराम असं होतं. (Sukhdev Thapar)
सुखदेव थापर (Sukhdev Thapar) हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि नौजवान भारत सभेचे सदस्य होते. त्यांनी पंजाब आणि उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी चळवळी सुरू केल्या होत्या. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे पंजाब युनिटचे प्रमुख होते. असोसिएशनचे निर्णय घेण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. (Sukhdev Thapar)
(हेही वाचा – डीएचएफएलचे माजी संचालक Dheeraj Wadhawan यांना सीबीयाकडून अटक)
खटल्यातले सुखदेव थापर हे मुख्य संशयित
१९२९ साली क्रांतिकारी चळवळीचा एक भाग म्हणून तुरुंगात उपोषण करण्यात आलं होतं आणि आणखीही काही चळवळी घडवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुखदेव थापर (Sukhdev Thapar) यांचा सहभाग होता. जेष्ठ नेते लाला लजपतराय यांच्या भीषण मृत्यूचा सूड उगवण्यासाठी १७ डिसेंबर १९२८ साली सुखदेव थापर, शिवराम राजगुरू आणि भगतसिंग यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक जे.पी. सँडर्स याचा वध केला होता. त्यानंतर १९२९ ते १९३० सालादरम्यान त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. त्या खटल्यातले ते मुख्य संशयित होते. (Sukhdev Thapar)
८ एप्रिल १९२९ साली नवी दिल्लीतल्या सेन्ट्रल असेंम्बली हॉलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांना ब्रिटिश पोलिसांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. (Sukhdev Thapar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community