भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात जहाजेतुन मारलेल्या साहसी उडीला ११३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
समूहाच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस संभाजी देशमुख यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस आकाश नेहेरे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले, त्यानंतर सावरकर स्मारकात योगेश बुरके व सुनील जोरे यांनी वीर सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला, याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जग प्रसिद्ध उडी बाबतची पार्श्वभूमी व तत्कालीन परिस्थितीवर आधारित मंजिरी ताई मराठे यांच्या लेखाचे वाचन मंगेश मरकड व शिरीष पाठक यांनी केले. तसेच नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आलेली होती त्या स्पर्धेतील राया टिळे दुर्वांश बोराडे शिव गीते अद्विक गायकर पार्थ शीदगुडे या पाच स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विजेते स्पर्धक व त्यांचे पालक तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
(हेही वाचा – Sharad Pawar : “न टायर्ड हू, न रिटायर्ड, मैं तो फायर हूं” – शरद पवार)
यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड संभाजी देशमुख आशिष वाघ, भूषण कापसे, सुनिल जोरे, भूपेश जोशी, आकाश नेहेरे, ओम देशमुख, गणेश राठोड , खंडू रामगडे, दीपक गायकवाड, सुभाष पुजारी, शंकर मुंढारे, संस्कार मरकड, राकेश शिदगुडे आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community