अयोध्येत २२ जानेवारीला भगवान श्री रामाच्या प्रतिष्ठापना मूर्तीची निवड अखेर निश्चित झाली आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या मूर्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांनी साकारलेली श्री रामाची मूर्ती अयोध्येत स्थापित केली जाणार असून अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
शिल्पकार योगीराज अरुण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी अरुण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती भेट देऊन चर्चा केली. या भेटीची छायचित्रे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. योगीराज अरुण यांनी २००८ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएदेखील केले आहे. ते प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत.
(हेही वाचा – कम्युनिस्ट सरकार बरखास्त करणारे आणि भारतातील पहिला प्रादेशिक पक्ष उभारणारे Mannathu Padmanabhan Pillai)
११ कोटी कुटुंबांना आमंत्रण…
राम लल्लाच्या दर्शनासाठी पूजा केल्या जाणाऱ्या अक्षतांच्या वितरणाला सोमवारी सुरुवात झाली. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेचे उद्दिष्ट देशातील ५ लाख गावांमधील ११ कोटी कुटुंबांना आमंत्रित करणे आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अयोध्येतील तुळशीनगर येथील वाल्मिकी बस्ती येथून या मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर अयोध्या महानगर आणि ग्रामीण भागांपासून अक्षता वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. अक्षता वितरण मोहिमेदरम्यान अक्षता असलेल्या पाकिटातून ५०० लोकांना अक्षता दिल्या जाणार आहेत. प्रत्येक कुटुंबात तांदळाची १५ ते २० पाकिटे वितरित केली जात आहेत.
राम लल्लासाठी ‘बनारसी पान’…
प्रभु श्री रामासाठी बनारसी पानाचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी विशेष बनारसी पान तयार करण्यात येणार आहे. हे पान अयोध्येतील हनुमान गढी येथील दीपक चौरसिया यांनी राम लल्लासाठी पान तयार करण्याची जबाबदारी बनारसच्या उमाशंकर चौरसिया या त्यांच्या नातेवाईकाकडे सोपवली आहे. उमाशंकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना १५१ पानांची ऑर्डर मिळाली आहे. हे पान तयार करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. बालक रुपात असताना प्रभु श्रीराम सुपारी खाऊ शकत नसल्यामुळे सुपारी बारीक कापून पाण्यात भिजवून खूप मऊ करून ती या पानात वापरली आहे. सर्व १५१ पान गोड असतील. या पानांना चांदीचा वर्ख लावलेला असेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community