International Society For Krishna Consciousness (ISKCON) ही जगभरात प्रसिद्ध असलेली एक अध्यात्मिक संस्था आहे. स्वामी भक्तिवेतांद प्रभुपाद (Swami Bhaktivedanta Prabhupada) हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आज ही संस्था पुष्कळ मोठी झाली आहे आणि जगभरात ही संस्था मंदिरे, शाळा, सेवा कार्य चालवत आहे. भक्तिवेदांत स्वामींनी भक्तिसिद्धांत स्वामींच्या प्रेरणेने इस्कॉनची स्थापना केली. (Bhaktisiddhanta Saraswati Goswami Prabhupada)
(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu : आमच्या सार्वभौमत्वात कोणाला हस्तक्षेप करू देणार नाही; मुइज्जू पुन्हा बरळले)
गौडीय वैष्णव धर्माची दीक्षा
भक्तिसिद्धांत सरस्वती यांचे नाव बिमला प्रसाद दत्त असे होते. बिमला प्रसाद यांचा जन्म १८७४ मध्ये पुरी येथे बंगाली हिंदू कायस्थ कुटुंबात झाला. त्यांनी ’पाश्चात्य आणि पारंपारिक भारतीय’ असे दोन्ही प्रकारचे शिक्षण घेतले आणि पुढे आध्यात्मिक विचारवंत म्हणून त्यांची ओळख होऊ लागली. त्यांना सिद्धांतसरस्वती म्हणून लागले. १९०० मध्ये, बिमला प्रसाद यांनी वैष्णव तपस्वी गौरकिशोर दास बाबाजी यांच्याकडून गौडीय वैष्णव धर्माची दीक्षा घेतली.
१९ आणि २० व्या शतकात बंगालमध्ये वैष्णव विचारांना चालना
स्वामी भक्तिसिद्धांत सरस्वती कृष्णभक्तीची जणू एक चळवळ सुरु केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९ आणि २० व्या शतकात बंगालमध्ये (Bengal) वैष्णव विचारांना चालना मिळाली. या चळवळीला ’सर्वात शक्तिशाली सुधारणावादी चळवळ’ असेही म्हणतात.
मात्र १९३७ मध्ये भक्तिवेदांतांच्या निधनानंतर गौडिया मठात अंतर्गत मतभेद उफाळून आले आणि याचा परिणाम या चळवळीवर झाला. पण त्यांच्या एका शिष्याने ३ दशकांनंतर १९६६ मध्ये न्यू यॉर्क येथे International Society for Krishna Consciousness (ISKCON) ची स्थापना केली. त्या शिष्याचे नाव होते भक्तिवेदांत स्वामी. त्यांनी गौडिया वैष्णव चळवळ पुन्हा सुरु केली आणि आज जगभरात त्यांचे ५ लाखांहून अधिक अनुयायी आहेत. (Bhaktisiddhanta Saraswati Goswami Prabhupada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community