भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात त्यांनी राडा घातला होता. तसेच पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि 50 लाख रुपयांची चोरी केले असल्याचा कारेमोरे यांच्यावर आरोप लावला होता. आज त्यांना त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केले. विविध कलमान्वये अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले आहे.
शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल
आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस ठाणे गाठले होते. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातच धिगांना घातला. आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र काल रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लाख रुपयांची रोकड घेऊन एका गाडीतून तुमसरकडे घेऊन जात होते. यावेळी मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर पोलिस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार राजू कारेमोरे यांनी माफी देखील मागितली होती.
(हेही वाचा महापालिकेचा मोठा निर्णय: मुंबईतील १ ली ते ८ वीच्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत टाळे!)
हे गुन्हे केले दाखल
आमदार राजू कारेमोरे यांच्यावर भादंवि कलम 353, 354, 294, 504, 506, 143,147, 149 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
Join Our WhatsApp Community