Ranjit Savarkar : जिहादी मुसलमानांच्या ताब्यात गेलेल्या पारंपरिक नौकानयन व्यवसायावर भंडारी तरुणांनी वर्चस्व मिळवावे; रणजित सावरकर यांचे आवाहन

शुक्रवार, ८ मार्चला महामानव भागोजीशेठ कीर यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या अर्ध-पुतळ्याचे अनावरण मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणजित सावरकर (Ranjit Savarkar) आपले विचार मांडताना बोलत होते.

167

भंडारी या समाजाचे मूळ नाव ‘भांडार’ यावरून आले, भांडार म्हणजे नाव, नौका. भंडारी समाजाचा नौकानयन हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय दुर्दैवाने आज कोकणस्थ मुसलमान म्हणजेच जिहादी मुसलमानांच्या ताब्यात गेला आहे. हा व्यवसाय छोटा-मोठा नाही. भागोजी कीर यांच्याकडून व्यवसायाची आणि मायनाक भंडारी यांच्याकडून शौर्याची प्रेरणा घेऊन भंडारी तरुणांनी नौकानयन या पारंपरिक व्यवसायावर पुन्हा वर्चस्व निर्माण करावे, आणि हीच खऱ्या अर्थाने भागोजी कीर यांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.

शुक्रवार, ८ मार्चला महामानव भागोजीशेठ कीर यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर (Bhagoji Keer) यांच्या अर्ध-पुतळ्याचे अनावरण मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणजित सावरकर (Ranjit Savarkar) आपले विचार मांडताना बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, भागोजी कीर यांचे नातू अंकुर कीर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचे शिष्य, आध्यात्मिक गुरु अविनाश महाराज, प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते.

तुमच्या रक्तात नौकानयन आहे

रणजित सावरकर (Ranjit Savarkar) पुढे म्हणाले, “या पूर्ण कोकण किनारपट्टीवरील व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ तर आहेच, पण राष्ट्राची सुरक्षा आज तुमच्या हातात आहे. तर मला वाटतं भंडारी जातीचं महत्त्व आहे आणि तुमच्या रक्तात नौकानयन आहे तर भंडारी समाजाने पुन्हा आपल्या व्यवसायात वर्चस्व निर्माण करावं.”

भागोजींचे दान निरपेक्ष

“मी विचार करत होतो की शून्यातून साम्राज्य अनेकांनी निर्माण केलं असेल. भागोजी कीर काही एकटेच नव्हते. मग यात विशेष काय? तर शून्यातून साम्राज्य उभे करून ते समाजाला दिलं आणि तेही निरपेक्षपणे, हे विशेष आहे. जेव्हा भागोजींनी पतीतपावन मंदिराची उभारणी करून दिली, तेव्हा या देशात अनेक मंदिरे दानातून उभी राहिली. पण दान देण्यातही माझं नाव राहिलं पाहिजे, ही जिथे कल्पना होती तिथे दानाला काही किंमत राहत नाही. पण भागोजींचे दान होतं ते निरपेक्ष होतं,” असे रणजित सावरकर यांनी सांगितले. कीर यांनी बांधलेल्या दादरच्या स्मशानभूमीला हिंदू स्मशानभूमी असे नाव द्या, असा सल्ला वीर सावरकर यांनी दिला, याची आठवण रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी करून दिली.

(हेही वाचा Veer Savarkar : भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी स्थान देऊन कार्यक्रमाचे ‘मैत्र जीवांचे’ नाव सार्थ ठरवले)

सगळ्यांसोबत सहभोजनाला उपस्थिती 

“भागोजी कीर यांनी स्वतः एक मंदिर बांधलं होतं ते म्हणजे भागेश्वर मंदिर, जिथे प्रवेश सगळ्यांना होता पण महादेवाची पूजा करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा वीर सावरकर त्यांना म्हणाले की, तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्ही मंदिर बांधून स्वतः पूजा करता, पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचे काय? तेव्हा भागोजींनी विचारलं की, तुम्ही सांगा कुठे मंदिर बांधायचे? आणि त्यांनी नुसते पैसे नाही दिले तर मंदिर बांधूनच दिले. मंदिर बांधल्यानंतर वीर सावरकरांनी सांगितले की, मंदिरात एक सहभोजन झाले पाहिजे. भागोजी त्या काळातल्या परंपरा पाळणारे होते. भागोजी यांना ते फार पटलं नव्हतं. पहिल्या सहभोजानाला ते बाजूला बसले पण नंतर ते स्वतः सगळ्या सहभोजनाला उपस्थित राहिले आणि एकदा त्यांचे गुरु गाडगे महाराजांनाही ते घेऊन आले होते. म्हणजे आपल्याला पटलं ते आपण केलं आणि ते दुसऱ्याकडून करवून घेतलं.”

जातीच्या संघटना हिंदू समाजात समाविष्ट व्हाव्यात

“या आधीचे वक्ते खासदार राहुल शेवाळे यांनी एक मुद्दा उपस्थित केला, मंजिरी मराठे याही त्याविषयी म्हणाल्या की, समाज जातीपातीत विभागला जात आहे, आपले संत महात्मे यांनाही जातीपातीत विभागले आहे. मला एक प्रश्न पडतो आणि वीर सावरकर यांनाही विचारलं गेलं होतं की, जातीची संघटना असावी की नाही? तर वीर सावरकरांनी उत्तर दिलं, ‘जातीची संघटना असावी पण माझी जात इतरांपेक्षा मोठी आहे किंवा लहान आहे, असा त्यात कुठलाही आकस, दुजाभाव असू नये. कारण जेव्हा समाज घडतो, तो एक व्यक्ती असतो, मग त्याचे कुटुंब, मग त्याचे पाहुणे-रावळे, आताचा सगेसोयरे शब्द आहे तो, त्यानंतर गाव आणि मग तुमची जात. मग जात समाजाचा घटक असतो. समाजात तीन हजाराहून अधिक जाती आहेत. त्या प्रत्येकाने आपले संघटन करून त्या अखिल हिंदू समाजात समाविष्ट झाल्या तर ते देशासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. जेव्हा तुम्ही चांगल्यासाठी संघटन करता आणि जातीच्या संघटनांचा वापर हिंदू समाजासाठी करतात तेव्हा जातीचे संघटन उपयुक्त असतं आणि मला अभिमान आहे की, मी अनेक वर्षापासून भंडारी समाजाशी जोडलेलो आहे. कारण मला इथे कधी दुजाभाव दिसला नाही, हे मान्य केले पाहिजे. तुम्ही देशासाठी एकात्मतेच्या भावनेने काम करता,” अशा शब्दांत रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी भंडारी समाजाचं कौतुक केलं.

(हेही वाचा Veer Savarkar आणि Bhagojisheth Keer यांचा स्वातंत्र्यलढा एका समाजासाठी नव्हता तर देशासाठी – राहुल शेवाळे)

‘हिंदू’ म्हणून एकत्र येण्याची गरज – मंजिरी मराठे

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असं म्हटलं होतं की, खरी जात मनुष्य, खरा धर्म मानवता, खरा राजा पृथ्वी आणि खरा देव ईश्वर. मला असं वाटतं की, आता खासदार राहुल शेवाळे म्हणाले ते अगदी खरं आहे की, आपण जाती-जातीमध्ये खूप विभागले गेलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की, ब्रिटिशांनी वैदिक आणि सनातनी म्हणजे ‘हिंदू’ हा प्रचार केला आणि आपण सगळे विभागले गेलो. वीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की, प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य आहे. भंडारी समाजाच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं आणि त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे. पण आपली जाती बाजूला ठेवून आज आपण एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र येण्याची गरज आहे तरच वीर सावरकर आणि भागोजी कीर यांचे कार्य आपल्याला समजलं, अस आपल्याला म्हणता येईल.”

तरच आपल्याला भवितव्य… 

“ज्या वेळेला दादरमध्ये स्मशानभूमी बांधण्याचं भागोजीशेठ कीर यांनी सांगितल्यानंतर, वीर सावरकर त्यांना म्हणाले की, ही स्मशानभूमी हिंदूंसाठी असली पाहिजे. भागोजीशेठ यांनीही फक्त भंडारी समाजासाठी नाही तर ते हिंदूंसाठी कार्य केलं. आजची सामाजिक स्थिती पाहता आपण उभे राहणे गरजेचे आहे, ते ‘हिंदू’ म्हणून. आज वॉशिंग मशीन दुरुस्त करायचे, फ्रिज दुरुस्त करायचा आहे तर आपली माणसं या व्यवसायात नाहीत. ओला, उबर व्यवसायात आपली माणसं नाहीत, कारण आपल्याला काम करायचं नसतं. पण भागोजीशेठ यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे, त्यांनी सुतार कामापासून सुरुवात केली आणि मोठे उद्योजक म्हणून यश मिळवलं. त्यामुळे आपल्या सगळ्या बांधवांना सांगू इच्छिते की छोट्यापासून सुरुवात करा, तर तुम्ही मोठे व्हाल. पण कामच केलं नाही तर काही अर्थ नाही. त्यामुळे आता अशी वेळ आहे की, तो बिहारी, उत्तर प्रदेशचा हे न पाहता तो हिंदू आहे का? हे बघणं गरजेचं आहे, तरच आपल्याला भवितव्य उरणार आहे,” असे मंजिरी मराठे म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.