कोरोनाशी लढताना आता भारताला अधिक बळ मिळणार आहे. कारण स्वातंत्र्यदिनी नागरिकांसाठी मोठी खूशखबर आहे. भारत बायोटेकने कोरोनाच्या बीबीव्ही १५४ इंट्रानेझल वॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. आता या वॅक्सीनला बूस्टर डोस म्हणूनही दिलं जाऊ शकतं असेही जाणकारांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – तीन तासांत खात्मा करणार… अँटिलिया प्रकरणानंतर अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी)
भारत बायोटेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बीबीव्ही १५४ इंट्रानेझल वॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलचा पहिला आणि दुसरा टप्पा यापूर्वीच झाला होता. या ट्रायलच्या दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या डोसची चाचणी करण्यात आली आहे, त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस पूर्ण केलेले आहेत.
Bharat Biotech completes clinical development for phase III trials and booster doses for BBV154 intranasal covid vaccine.#BharatBiotech #covid19vaccine #bbv154 #intranasalvaccine #covid19 pic.twitter.com/oh76drnezz
— Bharat Biotech (@BharatBiotech) August 15, 2022
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलमध्ये काही जणांना लसीचा डोस परीक्षणासाठी देण्यासाठी देण्यात आला होता. या सर्वांना सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून आतापर्यंत कोणत्याही गंभीर परिणामांची नोंद करण्यात आलेली नाही. साईड इफेक्टचा कोणतागी धोका नसल्याचे परिक्षणात आढळून आले आहे. तर या इन्ट्रानेजल डोसचे 9 जागी परीक्षण करण्यात आले होते, अशी माहिती भारत बायोटेकने दिली.
Join Our WhatsApp Community