कोवॅक्सिनबाबत अमेरिकेने केला मोठा खुलासा! कोवॅक्सिन लस प्रभावी आहे का? वाचा…

कोवॅक्सिनच्या प्रभावाबाबत प्रश्न निर्माण होत असताना आता अमेरिकेकडून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिन लसीच्या परिणामांबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना, आता अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि महारोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउकी यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीची कोवॅक्सिन ही लस कोरोनाच्या 617 व्हेरियंटवर प्रभावी असल्याचे फाउकी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले अँथनी फाउकी? 

अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांपैकी ज्यांना कोवॅक्सिनचा डोस देण्यात आला आहे, त्याआधारे कोरोनाच्या 617 व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी ठरत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. असे फाउकी यांनी सांगितले. तसेच कोरोनाविराधात लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोवॅक्सिन लस शरीरात अँटिबॉडी तयार करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. या अँटिबॉडीमुळे शरीरातील विषाणूवर मात करण्यास मदत दोत असल्याचे, न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेने दिले आश्वासन

अमेरिकेचे भारतासोबत असलेले नाते कायम राहील आणि या कठीण काळत सुद्धा अमेरिका भारताला मदत करेल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी भारताला मदत करण्यासाठी यंत्रणा विकसित करत असल्याचे आश्वासन दिले आहे.

अमेरिकेकडून साधनांचा भारताला पुरवठा

काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून रोखण्यात आलेला कोविशिल्डसाठी लागणा-या कच्च्या मालाचा पुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे. त्यासोबतच कोविड रुग्ण आणि फ्रंट लाइन वर्कर्सच्या सुरक्षेसाठी टेस्ट किट, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किटचा सुद्धा पुरवठा करण्यात येणार आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत सुद्धा विचार सुरू असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून हैद्राबाद येथील बायो-ई या फार्मा कंपनीला लस निर्मितीसाठी मदत केली जाणार आहे. 2022 पर्यंत 10 लाख लसींचे उत्पादन करण्यासाठी सक्षम करण्यात येणार असल्याचे, सांगण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here