भारत विकास परिषदच्या (Bharat Vikas Parishad) मुंबई प्रांतने यावर्षीपासून “संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याची स्पर्धा” आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रजासत्ताक दिनाचे अनुषंगाने शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी मालाड येथील डी जी खेतान इंटरनॅशनल स्कूल मधील सभागृहामध्ये ही स्पर्धा भरवली होती. भारत विकास परिषद मुंबई प्रांतमध्ये एकूण २३ शाखा असून त्यापैकी तेरा शाखांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा यांना द्वितीय क्रमांक मिळाला, भाईंदर पूर्व शाखेला तृतीय क्रमांक मिळाला तर प्रथम क्रमांक मालाड पश्चिम शाखेने मिळवला.
या स्पर्धेमध्ये भारत विकास परिषद (Bharat Vikas Parishad) विलेपार्ले शाखेची देखील टीम सहभागी झाली होती. त्या टीममध्ये प्रतिमा गायतोंडे या ६७ वर्षाच्या स्पर्धक तर काव्य गाढवे ही १९ वर्षाची स्पर्धक सहभागी झाली होते. त्याचप्रमाणे मिथिला गायतोंडे यांनी वंदे मातरम गीतावर अतिशय सुंदर नृत्य देखील सादर केले. त्या व्यतिरिक्त विलेपार्ले शाखेच्या संघामध्ये वृषाली कदम, दिव्या गाढवे, ईशा घाटे, प्रियंका चाळके, गार्गी तेंडुलकर या स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. सर्व स्पर्धकांनी विशिष्ट वेशभूषा केली होती. त्यामुळे भारताच्या विविधतेचे दर्शन यामधून झाले. काही संघांनी मराठी, काही संघांनी पंजाबी, काही संघाने राजस्थानी तर काही संघाने मद्रासी पद्धतीच्या वेशभूषा केल्या. गेले एक महिना हे सर्व स्पर्धा या स्पर्धेची तयारी करत होते त्यामुळे आपले राष्ट्रगान त्यांच्या नसानसामध्ये भिनले असे म्हणता येईल. त्याप्रमाणे याच स्पर्धेदरम्यान वंदे मातरम या राष्ट्रगान बद्दल एक शब्दमंजुषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. भारत विकास परिषद विलेपार्ले शाखाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी त्याचप्रमाणे सचिव संदीप पारिक सहसचिव ललित खेळा आणि कोषाध्यक्ष प्रशांत गंगवाल यांनी या स्पर्धेकरता एक उत्तम संघ निवडला आणि त्यांना संपूर्ण सहकार्य केले.
भारत विकास परिषद (Bharat Vikas Parishad) ही एक अराजकीय स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था सन १९६१ मध्ये स्थापन झाली असून त्या संस्थेचे आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये १६०० पेक्षा जास्त शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा म्हणजे भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा. या शाखेने गेल्या दोन वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून भारत विकास परिषदेच्या पश्चिम प्रादेशिक विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यातील शाखांपैकी सर्वोत्कृष्ट शाखा असा किताब पटकावला भारत विकास परिषदेतर्फे तरुण मुलांवरती खास करून विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवले जातात. “भारत को जानो” या स्पर्धेअंतर्गत शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये एक क्विज कॉम्पिटिशन घेतली जाते त्यामध्ये त्यांना भारतातील भौगोलिक परिस्थिती, इतिहास, शास्त्र, क्रीडा, राजकीय परिस्थिती इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात, त्याचप्रमाणे “राष्ट्रीय समूह गान स्पर्धा” या स्पर्धेअंतर्गत शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदी आणि संस्कृत मधील समूह गानाची स्पर्धा भरवली जाते. या दोन्ही स्पर्धांना संपूर्ण भारतातून २५ लाख ते ३० लाख विद्यार्थी सहभागी होतात.
Join Our WhatsApp Community