भिखारी ठाकूर (Bhikari Thakur) हे भोजपुरीचे लोककलाकार होते. काव्य, नाट्य लेखन, अभिनय, गीत लेखन, लोकनृत्य, लोक गायन अशा कलेच्या विविध क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर होता. ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांना भोजपुरीतील सर्वोत्कृष्ट लेखकांपैकी एक मानले जाते. त्यांची नाटके देखील प्रचंड गाजली. इतकी की त्यांना ’भोजपुरीतले शेक्सपियर’ म्हटले जायचे.
नृत्य मंडळाची स्थापना
भिखारी ठाकूर (Bhikari Thakur) यांचा जन्म १८ डिसेंबर १८८७ रोजी बिहारमधील सारण जिल्ह्यातील कुतुबपूर (दियारा) गावात एका झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दल सिंगार ठाकूर आणि आईचे नाव शिवकाली देवी होते. उदरनिर्वाहासाठी ते गाव सोडून खडगपूरला गेले. तिथे त्यांनी भरपूर पैसा कमावला पण त्यांना कामात समाधान मिळत नव्हते. ते हाडाचे कलाकार होते. एक कलाकार (Bhikari Thakur) माणूस केवळ पैसे मिळतात म्हणून कोणतेही काम करुन सुखी राहू शकत नाही. गावात त्यांनी नृत्य मंडळाची स्थापना केली आणि रामलीलेचे प्रयोग सुरु केले. यासोबतच त्यांनी गाणीही गायली आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. तसेच त्यांनी नाटके, गाणी आणि पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या पुस्तकांची भाषा अतिशय सोपी होती, ज्यामुळे लोक खूप आकर्षित झाले. त्यांनी लिहिलेली पुस्तके वाराणसी, हावडा आणि छपरा येथून प्रकाशित झाली.
(हेही वाचा-शिंडलर्स लिस्ट हा अप्रतिम आणि क्रांतिकारी चित्रपट दिग्दर्शित करणारे Steven Spielberg)
८३ व्या वर्षी त्यांचे निधन
अशा पद्धतीने ते बिहारी भाषेतले मोठे लोक कलाकार झाले. बिदेशिया, भाई-बिरोध, बेटी-बियोग या बेटी-बेचवा, कलयुग प्रेम, गबर घिचोर, गंगा स्नान, बिधवा-बिलाप, पुत्रबध, ननद-भौजाई, कलियुग-प्रेम, राधेश्याम-बहार अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली आहेत. १० जुलै १९७१ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community