शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

110

मुंबई उच्च न्यायालयाकडून आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, एनआयएने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्याने, उच्च न्यायालयाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचल्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनआयएने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील याचिकेवर सुनावणी पार पडली. आनंद तेलतुंबडेंची याचिका योग्य ठरवत मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

एप्रिल 2020 मध्ये तेलतुंबडेंना अटक करण्यात आली होती. आनंद तेलतुंबडे सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्ठित नव्हते आणि त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषणही केले नव्हते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

( हेही वाचा: ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S लाॅंच, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य )

काय आहे प्रकरण?

1 जानेवारी रोजी भीमा- कोरेगाव लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंसाचार उसळला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, 10 पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. भीमा- कोरेगाव संघर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान पोलिसांनी 162 जणांवर 58 गुन्हे दाखल केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.