भिवंडीत अग्नितांडव! भीषण आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक

90

भिवंडीत सतत आग लागण्याचे प्रकार कानांवर येत असतात. आता पुन्हा एकदा भिवंडी ग्रामीण भागात भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. तालुक्यातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा काॅम्लेक्स परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

जीवितहानी नाही

फर्निचर गोदाम या भीषण आगीत जळून खाक झाले आहे. तर, अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण

या गोदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे बाजूचे दोन फर्निचर गोदामही या आगीचे बळी ठरले आहेत. त्यामुळे या आगीत जवळजवळ तीन गोदाम खाक झाल्याची माहिती आहे. आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

( हेही वाचा: लाकूडतोडीसाठी गेलेल्या इसमावर बिबट्याचा भयानक हल्ला, वाचून व्हाल थक्क! )

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आग लागलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फर्निचर तयार करणारे मशिन तसेच फर्निचर होते. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.