पालघरमधील केमिकल कंपनीत भीषण आग

पालघर जिल्ह्यातील बोईसर इंडस्ट्रियल युनिटमधील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. प्लॉट नंबर ४१ वर असलेल्या राजकॉब इंडस्ट्रिज या कंपनीत सध्या अग्नितांडव सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

( हेही वाचा : LPG Gas Connection : १६ जून पासून घरगुती गॅस कनेक्शन महागणार! मोजावे लागणार एवढे रुपये)

केमिकल कंपनीत भीषण आग

अग्निशमन दलाच्या सहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, या कंपनीत कोणी कर्मचारी अडकले आहेत का याचा शोध सुरू आहे. कंपनीतील सर्व कर्मचारी आग लागल्यावर त्वरित बाहेर आले होते असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. केमिकलचे काम सुरू असताना ही घटना घडली परंतु या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असून आग विझवण्यासाठी १ ते २ तासांचा कालावधी लागू शकतो यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू होईल अशी माहिती घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here