मोठी बातमी! नाशिकच्या जिंदाल कंपनीत बाॅयलरचा स्फोट; 100 पेक्षा जास्त लोक अडकले

नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या कंपनीतील बाॅयलर फुटल्याची चर्चा परिसरात आहे. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये याचा परिणाम जाणवला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, नेमके काय घडले याचा तपास केला जात आहे.

( हेही वाचा: Google Doodle 2023: गुगलने बनवले नवं वर्षाच्या शुभेच्छा देणारे डूडल )

जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मीती करणा-या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कर्मचारी हे आत अडकल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.

काही कामगार जखमी 

ही आग इतकी मोठी आहे की, धुराचे मोठे मोठे लोट आकाशात दिसत आहेत. कंपनीच्या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कंपनीत लागलेली आग भीषण असून कंपनीत काम करणारे काही कामगार होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here