रियाझ काझीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अॅंटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात रियाझ काझीला हा दिलासा मिळाला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटकेचे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, पासपोर्ट जमा करण्याचे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर रियाझ काझीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
( हेही वाचा: जम्मू कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या 5 जणांना अटक)
Join Our WhatsApp Community