बारावी बोर्डाची परीक्षा सुरु असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधी गणिताच्या पेपरचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बारावीचा गणिताचा पेपर कोणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कोणाचा हात आहे? यामागे कोणते रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास सध्या केला जात आहे.
( हेही वाचा: ..असंच होणार म्हणतं अजित पवारांची संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावर खोचक प्रतिक्रिया )
काॅपीमुक्त अभियानाला हरताळ
बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार नुकताच निस्तरल्यावर आता बारावीच्या गणित पेपरचा नवा गोंधळ समोर आला आहे. 12 वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात काॅपीमुक्त अभियान रावबले जात असतानाच, पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे.