मोठी बातमी: TET घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद

142

TET घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ( TET Exam scam) ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा 2019 मध्ये 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आल्याने, या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले आहे. या गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.

या शिक्षकांच्या वेतन बंद करण्याच्या निर्णयाबरोबरच शालार्थ आयडीदेखील गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिका-यांना देण्यात येत आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतरसुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे, अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: जालन्यातील राम मंदिरातून 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला; पोलीस घटनास्थळी दाखल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.