मोठी बातमी! राज्याचे पणन अधिकारी शशिकांत घोरपडे यांचा नीरा नदीपात्रात मृतदेह सापडला

178

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता, मात्र शोध सुरु असताना NDRF च्या पथकाला शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.

घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ होते. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली होती. शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रालगत एका हाॅटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असल्याचे दिसले होते. यामुळे नेमक्या कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे, याबाबत स्पष्टता होत नव्हती. मात्र आता NDRF च्या पथकाला शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे.

( हेही वाचा: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.