सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातल्या त्यात व्हाॅट्सअॅपशिवाय आपले कामच होऊ शकत नाही. पण याचसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 500 दशलक्ष व्हाॅट्सअॅप युजर्सचे फोन नंबर लीक झाले असून, ते ऑनलाईन विकले जात आहेत. एका सायबर न्यूजच्या रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, हे आतापर्यंत सर्वात मोठ्या डाटा ब्रीचपैकी एक आहे.
सायबर न्यूजच्या अहवालानुसार, एका लोकप्रिय हॅकिंग फोरमवर विक्रीसाठी डेटाबेसमध्ये 84 देशांतील व्हाॅट्सअॅप युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. डेटा विकणा-या व्यक्तीचा दावा आहे की, सेटमध्ये एकट्या यूएसमधील 32 दशलक्ष युजर्सच्या रेकाॅर्ड्सचा समावेश आहे. याशिवाय इजिप्त, इटली, फ्रान्स, यूके, रशिया आणि भारतातील लाखो युजर्सचा डेटाही लीक झाला असून, त्याची ऑनलाईन विक्री केली जात आहे.
सायबर न्यूजच्या अहवालानुसार, यूएस डेटासेट 7 हजार डाॅलर्समध्ये उपलब्ध आहे, तर यूके डेटासेटची किंमत 2500 डाॅलर्स इतकी आहे.
( हेही वाचा: सामना रद्द; तरी भारताने रचला विश्वविक्रम, ‘हा’ वर्ल्ड रेकाॅर्ड झाला भारताच्या नावे )
या माहितीचा वापर फसवणुकीसाठी केला जातो
अशी माहिती अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाते. जसे की स्मिशिंग आणि विशिंग, ज्यामध्ये वापरकर्त्यांना मजकूर संदेश पाठवले आणि त्यांना लिंकवर क्लिक करण्यास सांगणे समाविष्ट असते. त्यानंतर वापरकर्त्याला त्यांचे क्रेडिट कार्ड किंवा इतर वैयक्तिक तपशील प्रदान करण्यास सांगितले जाते. असा डेटा अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरला जातो. जसे की, स्मिशिंग आणि विशिंग. ज्यामध्ये युजर्सना मेसेज पाठवून त्यातील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्यानंतर युजर्सना त्याचे क्रेडिट कार्ड किंवा इतर व्यक्तिगत तपशील प्रदान करण्यासही सांगितले जाते.