ओडिशातल्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण भारताला हलवून टाकले आहे. देशातली ही पहिलीच घटना आहे ज्यात एकावर एक अशा तीन रेल्वे आदळल्या होत्या. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यानुसार या अपघातात २८८ जणांनी प्राण गमावला आहे तर तब्बल ९०० जण जखमी झाले आहेत.
भारतात यापूर्वी सुद्धा रेल्वेचे अपघात झाले आहेत. ओडिसातल्या या अपघातापेक्षा भयंकर अपघात बिहारमध्ये झाला होता. १९८१ मध्ये झालेल्या त्या दुर्घटनेत ८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र रेल्वेच्या इतिसाहातील सर्वात भीषण अपघात श्रीलंकेत झाला होता.
घरी परतले फक्त…
हा अपघात २६ डिसेंबर २००४ ला श्रीलंकेत झाला होता. त्यावेळी समुद्रदेवी नामक एका रेल्वेचा अपघात झाला होता. अपघाताच्या वेळी रेल्वेतून १७०० हून अधिक लोक प्रवास करत होते. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांपैकी फक्त १५० लोक त्या दिवशी घरी परत परतले.
(हेही वाचा – Odisha Train Accident : जखमी प्रवाशांना मदत देणे आमची प्राथमिकता; अश्विनी वैष्णव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही)
ती आली, घेऊन गेली
२६ डिसेंबरला सकाळी सहा वाजता ही ट्रेन कोलंबो शहरातून गाले शहराच्या दिशेने निघाली होती. ही ट्रेन तेलवट्टा या भागातून पुढे जाणार होती, जे समुद्रकिनाऱ्यापासून फक्त २०० मीटर दूर आहे. ही ट्रेन सकाळी ०९:३० च्या सुमारास तेलवट्टा जवळच्या पेरालिया गावात पोहोचली. त्यावेळी भूकंपामुळे एक त्सुनामी आली. या त्सुनामीमुळे रेल्वेचे सगळे डबे पाण्याखाली गेले. डब्यात पाणी भरल्यामुळे सगळे प्रवासी तातडीने रेल्वेच्या डब्यावर उभे राहण्यासाठी धडपड करू लागले. काही प्रवासी रेल्वेच्या डब्यावर उभे राहिले तर काही रेल्वेच्या मागे आडोशाला उभे राहिले. या धक्क्यातून सगळे सावरणार तितक्यात अजून एक लाट आली. ती लाट रेल्वेच्या सगळ्या डब्यांना स्वत:सोबत घेऊन गेली. मृत्यूमुखी पडलेल्या एकूण १७०० जणांपैकी फक्त ९०० जणांचे मृतदेह सापडले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community