चक्क मुंग्यांनी लावला सोन्याच्या खजिन्याचा शोध!

96

सर्वांनी मुंगी आणि हत्तीच्या कथा ऐकल्याच असतील, या कथांमधून एवढीशी मुंगी कशी बलाढ्य हत्तीला धडा शिकवते हेच या कथांचे तात्पर्य असते. आता एवढुश्या मुंग्यांनी चक्क सोन्याच्या खजिन्याचा शोध लावला आहे. बिहारमधील जमुईमध्ये या सोन्याच्या खजिनाचा शोध लागला आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पहिल्यांदा मुंग्यांनी येथे सोन्याचा खजिना असल्याचे संकेत दिले होते. तसेच, मेंढपाळ उन्हापासून बचाव करण्यासाठी वटवृक्षाखाली जमायचे. मुंग्या त्या झाडाभोवती मातीचे कण गोळा करून स्वतःचे घर बनवत होत्या. दरम्यान, मातीच्या कणाची पिवळी चमक काही लोकांना आकर्षित करत होती, त्यातुनच खजिन्याचा शोध लागला.

तब्बल 40 वर्षांनी खजिना सापडला

देशातला सर्वांत मोठा सुवर्णसाठा शोधून काढला आहे. बिहारमधल्या जमुई जिल्ह्यातल्या ललमटिय व करमटिया  या भागांमध्ये देशातला सर्वांत मोठा सोन्याचा साठा असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. देशातल्या सोन्याच्या एकूण साठ्यांपैकी 44 टक्के सोनं या दोन प्रदेशांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ज्या ठिकाणी आतापर्यंत फक्त नक्षलवाद्यांच्या बंदुकांचे आवाज ऐकायला मिळत होते, त्या ठिकाणी आता सोनं मिळणार आहे, असे सांगितले आहे. हा खजाना पूर्णपणे शोधण्यासाठी 40 वर्षं लागली असली, तरी आता सरकारने देशातला सोन्याचा सर्वांत मोठा साठा असण्याला दुजोरा दिला आहे.

( हेही वाचा: आता फ्लाईटमध्ये अन् एअरपोर्टवर ऐकू येणार भारतीय संगीत!)

जीएसआय टीमने मातीचे नमुने केले गोळा

या ठिकाणी 223 दशलक्ष टन सोनं असल्याचा अंदाज आहे. 1982 ते 1986 या चार वर्षांच्या काळात जीएसआय टीमने  या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या ठिकाणी उत्खनन केलं होतं. उत्खननाच्या खर्चाचा विचार करता त्या प्रमाणात सोनं उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये, जीएसआय टीमने पुन्हा जमिनीच्या वरच्या थरातल्या मातीचे नमुने गोळा केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.