बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात, 30 जणांना ट्रकने चिरडले, 12 जणांचा मृत्यू

155

बिहार राज्यातील हाजीपूर जिल्ह्यातील देसरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सुलतानपूर गावात रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. बिहारची राजधानी पटणापासून ३० किमी अतंरावर असलेल्या वैशाली जिल्ह्यात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात असून या अपघातात लहान मुले आणि महिलांसह १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून या अपघातावर शोक व्यक्त कऱण्यात आला आहे. या अपघात ग्रस्तांना केंद्राकडून आणि बिहार सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – 7th Pay Commission: वेतन सुधारणा समिती २०२२ समोर बाजू मांडण्याचा महापालिका कामगार आणि संघटनांसाठी शेवटचा दिवस)

कशी घडली घडना

वैशाली जिल्ह्यात रस्त्याला लागून असलेल्या गावात काही लोक स्थानिक देवता भूमिया बाबाची पूजा करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या पिंपळाच्या बाजूला एकत्र जमले होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. १२० च्या वेगाने भरधाव येणाऱ्या ट्रकने पूजेसाठी जमलेल्या लोकांना धडक दिले यावेळी १२ जण जागीच चिरडले गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आरजेडी आमदार मुकेश रोशन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तर नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी ही वाहतूक सुरूळीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांना २ लाख रूपये आणि जखमींना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.