गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बचाव पथकातील ७ पोलिसांसह ३० जण गंभीर जखमी

144

बिहारच्या औरंगाबादमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत ३० जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथक पोहोचले, दुर्दैवाने या पथकातील ७ कर्मचारीही या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

( हेही वाचा : दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागांची बंपर भरती, ६९ हजारांपर्यंत मिळेल पगार)

३० जण गंभीर जखमी 

बिहारमधील औरंगाबादमध्ये शहागंज परिसरात अनिल गोस्वामी यांच्या घरी महिला छठ पूजेसाठी प्रसाद बनवत होत्या. यावेळी सिलेंडरमधून गॅसगळती झाल्याने घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केली. दरम्यान घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. यातील ७ पोलिसांसह एकूण ३० जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

सध्या जखमींवर उपचार सुरू असून यातील १० जणांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारांनंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. छठ पूजेसाठी घरात प्रसाद बनवण्याचे काम सुरू होते त्यावेळी गॅस गळती सुरू झाली. सिलेंडरला आग लागून स्फोट झाल्यावर ३० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पीडित कुटुंबाचे प्रमुख अनिल गोस्वामी यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.