जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी राज्यातील विविध ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली. बीड, वाशिम, रत्नागिरीसह राज्यभरातील अनेक ठिकाणच्या शिक्षकांनी यात सहभाग घेतला होता.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारकडून पोलिसांना गिफ्ट; नैमित्तिक रजा वाढवल्या)
येत्या काळात मागण्या पूर्ण न झाल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील या शिक्षकांनी यावेळी दिला आहे. २००५ साली नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्याचबरोबर एनपीएस ही योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी या शिक्षतांनी आज बाईक रॅली काढली आहे. जुन्या सरकारकडे या बद्दल अनेकदा मागणी केली आहे, त्यांनी आश्वासन देऊनही जुनी पेन्शन योजना लागू झाली नसल्याने नव्या सरकारने तरी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती शिक्षकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
साडेतीन वर्षांनंतरही निर्णय नाही
कर्मचाऱ्यांच्या अनेक वेळा करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन पेन्शन योजनेबाबत विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारने १९ जानेवारी २०१९ रोजी अभ्यास समितीची स्थापना केली होती. या समितीच्या दोन-तीन बैठका झाल्या, परंतु साडेतीन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने राज्यातील सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत राज्यव्यापी बाईक रॅली काढली.
Join Our WhatsApp Community