मंगळावर जीवसृष्टीचा वास आहे की नाही हे शोधण्यासाठी जगभरातील अनेक संशोधकांकडून शोध घेण्यात येत आहेत. याबाबत आता महत्वाची माहिती समोर येत आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर अथांग असा महासागर असल्याचा दावा आता करण्यात येत आहेत. याबाबत अनेक पुरावे देखील सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून माहिती
विशेष मोहिमेंतर्गत मंगळावर संशोधन करणा-या रोव्हरने मंगळावर पाणी असल्याचे पुरावे दिले आहेत. या संशोधनात काही धक्कादायक पुरावे सापडले असून 350 अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक विशाल असा महासागर होता आणि तो शेकडो हजार चौरस किमीपर्यंत पसरला होता, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे. सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे.
(हेही वाचाः 2025 पर्यंत भारतात मधुमेही रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढणार? काय आहे WHO चा रिपोर्ट)
…म्हणून केला जातोय दावा
मंगळ ग्रहाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांकडून शोध घेण्यात येत आहे. मंगळावर केवळ धुळीचे साम्राज्य असल्याचे बोलले जाते. पण त्याच मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये नद्यांनी उंचावलेल्या 6 हजार 500 किमी पेक्षा जास्त प्रवाही पर्वतरांगा दिसून येत आहेत. तसेच डेल्टा नदी प्रदेशात पाणबुडीचे पट्टे देखील आढळल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच मंगळावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे बोलले जाते.
Join Our WhatsApp Community