मुंबई शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचे रविवार सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. भारतातील अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते. त्यांच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे भांडवली बाजाराचे लक्ष लागून राहायचे. यासह गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या आकसा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते.
(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)
राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
Billionaire veteran investor and Akasa Air founder Rakesh Jhunjhunwala passes away at the age of 62 in Mumbai pic.twitter.com/36QcRfHXsa
— ANI (@ANI) August 14, 2022
असे सांगितले जात आहे की, ८० च्या दशकात राकेश झुनझुनवाला यांनी वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरूवात केली होती. त्यावेळी अवघ्या ५ हजार रूपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजारांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रूपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचे झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. ते कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत राकेश झुनझुनवाला हे ३२ व्या स्थानी होते. जुलै २०२२ च्या शेवटी त्यांची संपत्ती ५.५ अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
कोण होते झुनझुनवाला
- राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबाद येथे झाला होता. १९८५ मध्ये सिडनहॅम कॉलेजमधून पदवी घेतली. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
- शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर त्यांनी एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. आकाशा एअर या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि ७ ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे.
- शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे अब्जाधीश संपत्ती असलेल्या व्यक्तीचा प्रवास केवळ ५ हजार रुपयांपासून सुरू झाला होता.
- भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक व्यापारी होते. स्टॉक ट्रेडिंग कंपनी रेअर एंटरप्रायझेसचे ते स्वत: मालक होते. याशिवाय टायटन, स्टार हेल्थ, टाटा मोटर्स आणि मेट्रो ब्रँड यांसारख्या कंपन्यांत समभागांमध्ये ते सर्वांत मोठे गुंतवणूकदार होते.
- त्यांच्या पत्नीचे नाव रेखा आहे. झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची अकासा एअरमध्ये सर्वांत मोठी हिस्सेदारी आहे. यात दोघांचा एकूण वाटा ४५.९७ टक्के आहे.