Bio Manufacturing In India : लवकरच अव्वल 5 जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये भारताचा समावेश होईल : डॉ जितेंद्र सिंह

160
Bio Manufacturing In India : लवकरच अव्वल 5 जागतिक जैव-उत्पादन केंद्रांमध्ये भारताचा समावेश होईल : डॉ जितेंद्र सिंह

लवकरच म्हणजेच 2025 पर्यंत भारताचा अव्वल 5 जागतिक (Bio Manufacturing In India) जैव-उत्पादन केंद्रांमध्ये समावेश होईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. प्रगती मैदानावर 4 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत जैवतंत्रज्ञानावरील “ग्लोबल बायो-इंडिया – 2023” हे भव्य आंतरराष्ट्रीय संमेलन होणार आहे. त्याच्या संकेतस्थळाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जैव अर्थव्यवस्थेने (Bio Manufacturing In India) गेल्या 9 वर्षात वार्षिक दोन अंकी विकास दर पाहिला आहे. भारत आता जगातील अव्वल 12 जैवतंत्रज्ञान ठिकाणांपैकी एक आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

नेमकं काय म्हणाले डॉ जितेंद्र सिंह?

“भारताची जैव अर्थव्यवस्था (Bio Manufacturing In India) 2014 मध्ये फक्त 10 अब्ज डॉलर्स होती, सध्या ती 80 अब्ज डॉलर्स आहे. फक्त 8/9 वर्षात ती 8 पटींनी वाढली आहे आणि आपण 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचण्यास उत्सुक आहोत. जैव अर्थव्यवस्था हे भविष्यात उपजीविकेचे एक मोठे फायदेशीर साधन ठरणार आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश आज सगळ्या जगाला मदत मागत आहे’; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला नाव न घेता टोला)

भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र गेल्या तीन दशकांमध्ये विकसित झाले आहे आणि आरोग्य, औषध, कृषी, उद्योग आणि जैव-माहितीशास्त्र यासह विविध क्षेत्रांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ” (Bio Manufacturing In India)

पुढे बोलतांना डॉ सिंह म्हणाले की, “भारताच्या भावी अर्थव्यवस्थेसाठी जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्स महत्त्वपूर्ण आहेत. जैवतंत्रज्ञान हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे कारण माहिती तंत्रज्ञान आधीच त्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले आहे. भारतात प्रचंड जैवसंपदा (Bio Manufacturing In India) आहे. अजून वापरली गेलेली नाहीत अशी संसाधने वापराच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषत: हिमालयातील विशाल जैवविविधता आणि अद्वितीय जैव संसाधनांमुळे जैवतंत्रज्ञानाचा लाभ झाला आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.