समुद्राजवळील खडकाळ बेटांमधील जैवविविधतेचा अभ्यास, कांदळवन विभागाकडून संवर्धनाचा विचार

134

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीला लागून असलेल्या खडकाळ भागांमधील जैवविविधतेपाठोपाठ शास्त्रज्ञांनी समुद्राजवळच वसलेल्या खडकाळ बेटांचाही अभ्यास केला आहे. या अभ्यासातून खडकाळ बेटांच्या भागांत २१ अपृष्ठवंशीय तर ५ पृष्ठवंशीय प्राणी-पक्ष्यांची नोंद करण्यात आली. या रंजक माहितीनंतर वनविभागाचे कांदळवन, कक्ष किनारी भागांच्या संरक्षित योजनांच्या तयारीला लागले आहे. आगामी काळात समुद्रकिना-यालगत वसलेल्या जैवविविधतेचा सतत अभ्यास झाल्यास संवर्धन क्षेत्राचाही विचार होऊ शकतो.

राज्याच्या कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सागरीजीवांची माहिती घेण्यासाठी २०२० पासून कांदळवन कक्षाने शास्त्रज्ञांच्या मदतीने अभ्यास सुरु केला. सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी एण्ड नॅचरल हिस्ट्रील (सॅकॉन) या प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी संस्थेने हा अभ्यास हाती घेतला. संस्थेचे संस्थापक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा काळवकर्ते यांनी वेंगुर्ला रॉक्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकाळ भेटांना भेट देऊन बेटांमधील जैवविविधता तपासली.

कोरोकाळातील निर्बंधामुळे शास्त्रज्ञांनी या सर्व्हेक्षणाचा अहवाल मार्च २०२० मध्ये कांदळवन कक्षाला सुपूर्द केला. खडकाळ बेट ही समुद्रातील परिसंस्था व त्यातील अंतर्गत रहस्य आजही कित्येकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. तब्बल २० बेटांना शास्त्रज्ञांनी भेट दिली. त्यापैकी न्यू लाइटहाऊस बेट, ओल्ड लाइटहाऊस बेट आणि बेन्ट आयलँण्ड या आकाराने मोठ्या असलेल्या तीन बेटांसह छोट्या आकारांची नऊ बेटे आणि पाण्याखाली असलेल्या खडकांमधील जैवविविधता शास्त्रज्ञांनी तपासली.

वेंगुर्ला रॉक्समधील जैवविविधता –

खडकाळ बेटांच्या भागांत २१ अपृष्ठवंशीय तर ५ पृष्ठवंशीय प्राणी-पक्ष्यांची नोंद करण्यात आली. कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतुर, रातकीडा, ख्रिसमस ट्री वर्म्स, सिल्वर फिश, बरनॅक्स तसेच पाकोळी, कबुतरे, मार्टिन हे पक्षी तसेच घूस आणि पाल शास्त्रज्ञांच्या पाहणीत आढळले.

कोरोनामुळे सर्व्हेक्षण पुढे लांबले. सॅकॉनकडून मार्च महिन्यात प्रकल्प सुपूर्द केला गेला. खडकाळ बेटांमधील जैवविविधतेचे सर्व्हेक्षण पहिल्यांदाच झाले आहे. वेंगुर्ला रॉक्स या भागांत तीन-चार बेटे आहेत. त्यापैकी पाकोळी गुहेपर्यंत शास्त्रज्ञांना पोहोचता आले. या गुहेत ४ हजार ७०० पक्ष्यांची घरटी शास्त्रज्ञांना आढळली. भारतीय पाकोळ्यांची घरटीही मोठ्या संख्येत दिसून आली. या सर्व जागा संवर्धनात्मक उपाययोजनांसाठी योग्य आहेत.
डॉ मानस मांजरेकर, सहसंचालक, संशोधन आणि मनुष्य गुणवत्ता, मॅनग्रुव्ह फाऊंडेशन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.