केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आता वेळेत कार्यालयात पोहोचा! कारण…

८ नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक हजेरी होणार सुरू

केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालय आणि सरकारी विभागात बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. वेळ आणि कामाची शिस्त लावण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे त्यावेळी स्वागत करण्यात आलं होतं. गेल्या वर्षात मार्च २०२० पासून कोरोना महामारीची साथ आली त्यानंतर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तेव्हापासून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची रजिस्टरवर हस्ताक्षर करुन हजेरी घेतली जात होती. सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाचा धोका असलेल्या सर्वच वस्तू किंवा घटकापासून लांब राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने केंद्र सरकारमधील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचणं गरजेचं असणार आहे.

८ नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक हजेरी सुरू

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्य शासकीय कार्यलयांमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांची उपस्थिती मर्यादित करण्यात आली होती. त्यानंतर त्यात टप्प्या-टप्याने वाढ देखील करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून बायोमॅट्रिक हजेरीचा वापर स्थगित करून बायोमेट्रिक हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली होती. त्यामुळे उशिराने कार्यालयात पोहोचले तरी लेटमार्ग किंवा पगार कापण्याची कोणतीही भिती नव्हती. परंतु आता बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली ८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – अजित पवारांच्या अडचणी वाढल्या! कोणी केली कारवाई?)

कोरोना नियमांचं करावं लागणार पालन

दरम्यान, बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयानंतर बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर असणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपली हजेरी लावण्यापूर्वी कोरोना नियमांचे पालन करून सॅनिटायझरने हात साफ करणं गरजेचे असणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेशानुसार, बायोमॅट्रिक मशीनवर आपली हजेरी लावताना प्रत्येक कर्मचाऱ्याने आपसांत किमान ६ फूट अतंर राखणं आवश्यक असेल तर एखाद्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर बायोमॅट्रिक हजेरी लावण्यासाठी गर्दी होत असेल तर अतिरिक्त बायोमॅट्रिक मशीन लावण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here