प्रोफेसर रामकृष्ण विजयाचार्य होसूर हे एक भारतीय जैवभौतिक शास्त्रज्ञ आहेत. अणु चुंबकीय अनुनाद आणि आण्विक जैवभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या कौशल्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. रामकृष्ण विजयाचार्य होसूर (Ramakrishna Hosur) यांचा जन्म १६ मे १९५३ रोजी दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात झाला. १९७१ मध्ये कर्नाटक विद्यापीठातून ५ वा क्रमांक मिळवून त्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह पदवी प्राप्त केली आणि १९७३ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी-बी) मधून रसायनशास्त्र, एमएससीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
विविध विषयांवर महत्त्वाचे संशोधन
पुढे त्यांनी १९७८ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), मुंबई येथून पीएचडी पूर्ण केली. होसूर यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राउरकेला येथे न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्सवर अध्यापन केले आहे आणि या संस्थांमध्ये बायोमॉलिक्युलर न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स, आण्विक बायोफिजिक्स आणि बायोफिजिकल केमिस्ट्री या विषयांवर महत्वाचे संशोधन केले आहे.
वैज्ञानिक क्षेत्रात मोलाची भर
डॉ. होसूर यांच्या प्रयत्नांमुळे क्वाड्रुप्लेक्स डीएनए स्ट्रक्चर्समध्ये नवीन स्ट्रक्चरल मॉटिफ्सचा शोध लागू शकला. त्यांनी HIV-१ प्रोटीजमधील folding hierarchy स्पष्ट करुन सांगितले आहे. होसूर हे टाटा इन्स्टिट्यूटमध्ये २००३ पासून केमिकल सायन्सेस विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. प्रोफेसर होसूर यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथे प्रोफेसर डी.जे. पटेल यांच्या प्रयोगशाळेत १९८८ मध्ये तीन महिने काम केले आहे. वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community