गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात गुरुवारी, १५ जूनला बिपरजॉय चक्रीवादळ धडकले. या परिसरात संध्याकाळी ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहत असून वाऱ्यांचा वेग ताशी १५० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यापरिसरात मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू होते.
चक्रीवादळामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, आतापर्यंत ९४ हजारांहून अधिक लोकांना किनारी भागातून हलवण्यात आले आहे. कोस्टगार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये १५ जहाजे आणि ७ विमाने सज्ज आहेत. तसेच एनडीआरएफच्या २७ तुकड्याही तैनात आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय अशा ८ राज्यांमध्ये दिसून आला. दक्षिण अरबी समुद्रात वादळाची उत्पत्ती झाल्यानंतर, गुजरात किनारपट्टीजवळ येईपर्यंत त्याचा मार्ग अनेक वेळा बदलला. यामुळे ते कमकुवत झाले आहे, परंतु काही वेळा ते धोकादायक बनले.
(हेही वाचा – पुणे आकाशवाणीवरील बातमीपत्रे सुरुच राहणार)
गुजरातच्या ८ किनारी जिल्ह्यांतील ७५ हजार लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये नेण्यात आले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यातून ३४ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर जामनगरमध्ये १० हजार, मोरबीमध्ये ९ हजार २४३, राजकोटमध्ये ६ हजार ८९, द्वारकामध्ये ५ हजार ३५, जुनागढमध्ये ४ हजार ६०४, पोरबंदरमध्ये ३ हजार ४६९ आणि गिर सोमनाथ जिल्ह्यात १६०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने ६७ गाड्या रद्द केल्या आहेत, तर २५ गाड्या चक्रीवादळ प्रवण भागात वळवल्या आहेत. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ पाकिस्तानातील सिंध भागातील केटी बंदरात धडकणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community