हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह होते ‘हे’ चौदा सहकारी!

लष्कराचे हेलिकॉप्टर बुधवारी, ८ डिसेंबर रोजी तामिळनाडू येथील कोन्नूर या ठिकाणी कोसळले. त्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपीन रावत यांचा समावेश होता. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये होते १४ जण

या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स, जनरल बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा समावेश होता. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एसएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी यांच्यासह एकूण १४ लोक होते. हवालदार सतपाल हे सुद्धा हा हेलिकॉप्टरवर उपस्थित होते.

( हेही वाचा : कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत? जाणून घ्या… )

एम-आय १७ व्ही ५ 

एम-आय १७ व्ही ५ असे या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव आहे. हे हेलिकॉप्टर अधिक सुरक्षित असते, त्याला दोन इंजिन असतात. तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर वापरले जाते. या घटनेच्या अधिक चौकशीचे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here