कोरोना महामारीत ‘या’ फ्लूचा धोका, इंग्लंडमध्ये एकाला लागण

देशात कोरोना महामारीत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रसार देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने देशाच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत आता बर्ड फ्लूच्या प्रसाराबाबत तज्ज्ञही इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बर्ड फ्लूचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे आणखी प्रकार असू शकतात.

दरम्यान, इंग्लंडच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने ही घोषणा केली आहे. दक्षिण पश्चिम इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीमध्ये दुर्मिळ बर्ड फ्लू आढळून आला आहे. UKHSA ने दिलेल्या अहवालानुसार, बर्ड फ्लूची लागण झालेला हा व्यक्ती पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्याला हा संसर्ग झाला होता. त्या व्यक्तीने संक्रमित पक्षी आपल्या घराजवळ ठेवले होते. एजन्सीने सांगितले की, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला असून सर्व लोकांची चाचणी घेण्यात आली आहे आणि कोणत्याहीमध्ये संसर्गाची पुष्टी झालेली नाही. संक्रमित व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

(हेही वाचा – उच्च न्यायालय म्हणालं, ‘सार्वजनिक सुट्टी मागणं कायदेशीर अधिकार नाही’)

कशामुळे होतो बर्ड फ्लू

बर्ड फ्लूचा संसर्ग एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस H5N1 मुळे होतो. आत्तापर्यंत बर्ड फ्लू संदर्भात तो मनुष्यात पसरत नाही हे समोर आले आहे, मात्र खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी जनतेला मृत पक्ष्यांना हात न लावण्याचे आवाहन केले आहे. UKHSA ने सांगितले की बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. UKHSA चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी प्रोफेसर इसाबेल ऑलिव्हर यांनी सांगितले की, एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरसचा सर्वसामान्यांना धोका खूप कमी झाला असता, परंतु काही विषाणू माणसांमध्ये पसरल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here