बिरजू महाराज (Birju Maharaj) यांचे पूर्ण नाव ‘बृजमोहननाथ मिश्रा’ असे होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ साली लखनऊ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ महाराज असे होते. बिरजू महाराज ३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या ठायी असलेली प्रतिभा ओळखली आणि आपल्या मुलाला कलेची दीक्षा द्यायला सुरुवात केली. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात ना, “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.” तसेच काहीसे बिरजू महाराज यांचेही झाले.
(हेही वाचा – Nitin Gadkari : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी देणार)
श्रीकृष्णाशी संबंधित कथ्थक नृत्याचा वारसा –
पण त्यांना (Birju Maharaj) आपल्या वडिलांकडून जास्त काळ शिक्षण घेता आले नाही, कारण ते ९ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मग पुढे त्यांच्या काकांनी त्यांना आचार्य शंभू आणि लच्छू महाराज यांच्याकडे पुढचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. श्रीकृष्णाशी संबंधित कथ्थक नृत्याचा तर त्यांना वारसा मिळाला होता. बिरजू महाराज यांचे पूर्वज ईश्वरीप्रसाद मिश्रा हे कथ्थक नृत्याचे पहिले ज्ञात शिक्षक म्हणून ओळखले जातात.
सात वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा आपली कला सादर केली –
बिरजू महाराज (Birju Maharaj) सात वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा आपली कला सादर केली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १३ वर्षांचे असताना त्यांनी दिल्ली येथे ‘संगीत भारती’ कला विद्यालयात नृत्याचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. वयाच्या २८ व्या वर्षी बिरजू महाराजांना त्यांच्या कौशल्यासाठी ‘संगीत नाटक अकादमीचा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
(हेही वाचा – Southern Chile Fire : चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीत १९ जणांचा मृत्यू, ११०० घरे जळून खाक)
बॉलिवूडमध्येही मोठे योगदान –
बिरजू महाराज (Birju Maharaj) यांनी बॉलिवूडमध्येही आपले मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कित्येक हिंदी चित्रपटांच्या गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यापैकी प्रसिद्ध फिल्ममेकर सत्यजित रॉय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाचे नाव सांगता येईल. या चित्रपटात त्यांनी दोन गाणी संगीतबद्ध केली आणि गायली सुद्धा होती. तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोपडा यांचा चित्रपट ‘दिल तो पागल है’ आणि संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘देवदास’ या चित्रपटांची नावे प्रामुख्याने घेतली जाऊ शकतात.
नृत्यासह गायनातही पारंगत –
बिरजू महाराजांनी (Birju Maharaj) कथ्थक नृत्यामध्ये आपली एक नवीन शैली विकसित केली. तिला नृत्यनाटिका म्हणून ओळखले जाते. बिरजू महाराज फक्त नृत्यकलेतच नव्हे तर संगीत गायनातही पारंगत होते. ठुमरी, दादरा, भजन आणि गझल गाण्यात त्यांचा हात कोणीच पकडू शकत नव्हते. याव्यतिरिक्त संगीत वादनावरही त्यांची चांगली पकड होती. ते सतार, सरोद आणि सारंगी उत्कृष्टपणे वाजवत असत.
(हेही वाचा – Ganpat Gaikwad Firing : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा काम करीत आहे; आमदार गणपत गायकवाड यांचा थेट न्यायालयात आरोप)
१९८६ साली ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित –
आपल्या नृत्यप्रतिभेसाठी बिरजू महाराजांना (Birju Maharaj) अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९८६ साली त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना ‘कालिदास सन्मान’ आणि ‘डॉक्टरेट’ ही मानाची पदवी देऊनही सन्मानित केले गेले होते. वयाच्या ८३ व्या वर्षी १७ जानेवारी २०२२ साली आपल्या राहत्या घरी हार्ट अटॅक आल्याने बिरजू महाराज अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community