ब्रिटिशांच्या ह्रदयात धडकी भरवणार्‍या Chandrashekhar Azad यांची जयंती, वाचा खास लेख

147
ब्रिटिशांच्या ह्रदयात धडकी भरवणार्‍या Chandrashekhar Azad यांची जयंती, वाचा खास लेख

चंद्रशेखर सीताराम तिवारी म्हणजेच चंद्रशेखर आझाद हे एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने एक क्रांतिकारी संघटना सुरू केली. या संघटनेचे राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंह, राजेंद्र नाथ लाहिरी, भगतसिंह, सुखदेव, राजगुरु आणि अशफाकुल्ला खान असे प्रमुख नेते होते. (Chandrashekhar Azad)

आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ साली भाभ्रा गावातल्या अलिराजपूर संस्थानातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. आपल्या मुलाने मोठा संस्कृत पंडित व्हावं अशी त्यांच्या आईची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना बनारस इथल्या काशी विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवायला सांगितलं. (Chandrashekhar Azad)

पण १९२१ साली भारतभर असहकार चळवळ उच्च शिखरावर होती. त्यावेळी चंद्रशेखर आझाद हे १५ वर्षांचे विद्यार्थी होते. ते त्या असहकार चळवळीत सामील झाले. परिणामी त्यांना अटक करण्यात आली. अटकेच्या एका आठवड्यानंतर पारसी जिल्हा दंडाधिकारी न्यायमूर्ती एम.पी. खारेघाट यांच्यासमोर त्यांना हजर केलं गेलं. त्यावेळी त्यांना नाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव “आझाद” आणि वडिलांचं नाव “स्वातंत्र्य” असं सांगितलं. चंद्रशेखर आझाद यांना त्यांचं निवासस्थान विचारलं तेव्हा त्यांनी “तुरुंग” असं उत्तर दिलं. त्यावेळी न्यायदंडाधिकारी त्यांच्यावर संतप्त झाले आणि त्यांना १५ फटके मारण्याची शिक्षा सुनावली. (Chandrashekhar Azad)

(हेही वाचा – Union Budget 2024 : करदात्यांसाठी मोठी घोषणा; नव्या करप्रणालीत ‘इतक्या’ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त)

१९२२ साली असहकार आंदोलन स्थगित केल्यानंतर चंद्रशेखर आझाद निराश झाले. ते मन्मथ नाथ गुप्ता या तरुण क्रांतिकारकाला भेटले. त्यांनी त्यांची ओळख रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी करून दिली. रामप्रसाद बिस्मिल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर चंद्रशेखर आझाद यांनी ही संघटना नवीन नावाने पुढे सुरू ठेवली. (Chandrashekhar Azad)

चंद्रशेखर आझाद हे एचआरए संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी एचआरए संघटनेसाठी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. त्यातले बहुतांश निधी हा सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकून संकलित केलेला होता. १९२५ सालची काकोरी ट्रेन रॉबरी, लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १९२८ साली लाहोर येथे जॉन पी. साँडर्सवर गोळीबार आणि १९२९ सालचा भारताच्या व्हाईसरॉय ट्रेनला उडवण्याच्या प्रयत्न या सर्व क्रांतिकार्यांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग होता. म्हणून ब्रिटिश पोलीस त्यांच्या मागावर होते. (Chandrashekhar Azad)

(हेही वाचा – Budget 2024 : विरोधकांच्या बेरोजगारीच्या आरोपाला अर्थसंकल्पातून प्रत्युत्तर; नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद)

१७ फेब्रुवारी १९३१ साली चंद्रशेखर आझाद लपून बसलेल्या ठिकाणाची माहिती ब्रिटिशांना मिळाली. ते त्याठिकाणी सशस्त्र फौज घेऊन चंद्रशेखर आझाद यांना पकडण्यासाठी पोहोचले. ब्रिटिशांनी गोळीबार सुरू केला, चंद्रशेखर आझाद हे सुद्धा ब्रिटिश पोलिसांवर गोळीबार करत होते. बराच काळ चुरशीची झुंज सुरू होती. अखेर चंद्रशेखर आझाद यांच्या बंदुकीमध्ये एकच गोळी उरली होती. मोठ्या शिताफीने त्यांनी एका ठिकाणी स्वतःला लपवलं होतं. (Chandrashekhar Azad)

‘इंग्रजांच्या हाती जिवंत सापडायचं नाही’ अशी त्यांनी भीष्माप्रतिज्ञा केली होती. इंग्रज पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःवरच ती शेवटची गोळी झाडून घेतली आणि आत्मार्पण केलं. त्यांचा दरारा एवढा होता की, त्यांच्या मृत्यनंतरही बराच वेळ इंग्रज पोलीस त्यांच्या मृतदेहाजवळ जायला धजावत नव्हते. (Chandrashekhar Azad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.