६ जानेवारी २०२५ : Guru Gobind Singh यांची जयंती; जाणून घेऊया त्यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी…

707
दरवर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी, शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) जयंती यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. देशभरात ते प्रकाशपर्व म्हणून ओळखले जाते. शीख गुरू गुरु गोविंद सिंग हे केवळ योद्धाच नव्हते तर एक तत्वज्ञ, लेखक आणि कवी देखील होते आणि त्यांना संपूर्ण जगाच्या महान व्यक्ती होते.
गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. त्यांनीच गुरु ग्रंथसाहिब पूर्ण केले. खालसा पंतांच्या रक्षणासाठी गुरू गोविंद सिंग यांनी मुघलांचा अनेकदा सामना केला होता. त्यांनी गुरु ग्रंथसाहिबची स्थापना केली. गुरू गोविंद सिंग आतंकवाद आणि भेदभावाच्या विरोधात उभे राहिले. त्यातून लोकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी शीख धर्माच्या अनुयायांना चांगल्या आणि खऱ्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली.
शिखांचे १० गुरु, गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) जी यांचा इतिहास खूप प्रेरणादायी आहे. गुरु गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला. हिंदू कालगणनेनुसार, त्यांचा जन्म विक्रम संवत १७२३ मध्ये झाला असे म्हटले जाते. हा दिवस पौष महिन्याचा सातवा दिवस होता. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय असे होते.
गुरु गोविंद सिंग जी एक महान कवी, कुशल योद्धा आणि लेखक होते. त्यांना संगीताचीही चांगली गोडी होती. त्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली आणि सत्याचा मार्ग अवलंबला. ७ ऑक्टोबर १७०८ रोजी नांदेड, महाराष्ट्र येथे त्यांनी देह ठेवला. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा वाणी “वाहेगुरु जी की खालसा वाहे गुरु जी की फतह” ची घोषणा केली होती आणि आजही ती शीख धर्माची घोषणा आहे.
गुरु गोविंद सिंग (Guru Gobind Singh) यांनी शीखांना केस, कडा, कच्छा, कृपाण आणि कंगवा या ५ गोष्टी घालण्याचा आदेश दिला होता. या गोष्टींना “पाच काकर” म्हणतात, जे परिधान करणे सर्व शिखांसाठी अनिवार्य आहे. शीख समाजात गुरु गोविंद सिंग यांची जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी अनुयायांनी त्यांना आदरांजली वाहतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.