मुंबई महापालिकेची अर्थसंकल्पीय चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वरे सुरु असतानाच काँग्रेसचे मालाडमधील नगरसेवक विरेंद्र चौधरी हे एका महिलेशी अश्लिल वर्तन करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आल्याचे सांगत भाजप नगरसेविक रिटा मकवाना यांनी त्यांच्यविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे चर्चा सुरु असताना महिलेसोबत अश्लिल वर्तन!
मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पावर व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे चर्चा सुरु असून या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान काँग्रेस नगरसेवक विरेंद्र चौधरी हे एका महिलेसोबत अत्यंत खालच्या दर्जाचे अश्लिल वर्तन करत व्हिडीओमध्ये मला व सहकारी नगरसेविका सरीता पाटील यांना दिसले. ही बाब समस्त महिला नगरसेविक वर्गास व महापालिकेसारख्या उच्च दर्जाच्या सभागृहास शरमेने मान खाली घालायला लावणार असल्याचे त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचा : मुंबईत दीड महिन्यांत ४५ लाख लसीकरणाचे लक्ष्य!)
महापालिका सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
महापालिकेच्या सभागृहाचे काम सकाळी ११ वाजल्यापासून व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सुरु झाली होती. या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नगरसेवक विरेंद्र चौधरी यांच्यावर महापालिका सभागृहाचा व समस्त नगरसेवक वर्गाचा अवमान केल्याबाबत तसेच समस्त नगरसेवक वर्गाचा अवमान केल्याबाबत महापालिकेच्यामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. विरेंद्र चौधरी हे मालाडमधील प्रभाग क्रमांक ३३चे नगरसेवक असून पालकमंत्री अस्लम शेख यांचे खंदे समर्थक मानले जात आहेत. दरम्यान काँग्रेस नगरसेवक विरेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याच प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.