…म्हणून टिळक कुटुंबियांना डावलून कसब्यात भाजपाने दिला ब्राह्मणेतर उमेदवार

136
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होऊ घातलेल्या कसबा पेठ मतदारसंघात भाजपाने ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मतदारसंघातील मतदारांनी आतापर्यंत ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधीला येथून विधिमंडळात पाठविले. मग असे असताना भाजपाने अचानक रणनीती का बदलली, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली आहे.
या मतदारसंघातील बदललेली जातीय समीकरणे, हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. पुण्यातील पाॅलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, कसबा पेठ मतदारसंघात सध्या ब्राह्मण मतदारांची संख्या केवळ १३.२५ टक्के म्हणजे ३६ हजार ४९४ इतकी आहे. याउलट मागासवर्गीय समाजाचे मतदार ३१.४५ टक्के म्हणजे ८६ हजार ६२२, तर मराठा व कुणबी ६५ हजार ६९० मतदार आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन भाजपाने यावेळी ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे कळते.
प्रवर्ग                 टक्के     मतदार संख्या
ब्राह्मण –           १३.२५%       ३६,४९४
मराठा व कुणबी – २३.८५%     ६५,६९०
इतर मागासवर्ग–   ३१.४५%     ८६,६२२
अनुसूचित जाती –   ९.६७%     २६,६३४
अनुसूचित जमाती –  ४.१७%     ११,४८५
मुस्लीम –             १०.५०%      २८,९२०
जैन, ख्रिश्चन –       ७.११%       १९,५८३
एकूण मतदार –   २,७५,४२८

मैदानात कोण?

कसबा पेठ पोटनिवडणुकीचे तिकीट मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना जाहीर होईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात त्यांची लढत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.