चित्रा वाघ आता गौतमी पाटीलचे व्हिडिओ पाहणार

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भूमिका घेऊन सर्व यंत्रणांना सक्रिय करणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आता नृतिका गौतमी पाटील हिचे व्हिडीओ पाहणार आहेत.

गौतमी पाटीलचे व्हिडीओ मागून घेणार 

चित्रा वाघ यांनी सोमवार, ९ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर डोळ्यावर झापडे लावून आपण सर्व सहन करायचे काय? आम्ही विरोध केला नाही, तर उद्या तुमच्या चौकामध्ये असे नागडे नाच यायला वेळ लागणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी चित्रा वाघ यांना डान्सर गौतमी पाटील हिच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चित्रा वाघ यांनी कोण गौतमी पाटील? मी तिला ओळखत नाही, तिचे व्हिडिओ मागवून पाहून घेते, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

(हेही वाचा राहुल गांधींचे वादग्रस्त विधान; काँग्रेस तपस्वींचा पक्ष, भाजप व्यक्तीपूजा करणाऱ्यांचा पक्ष)

कोण आहे गौतमी पाटील? 

गौतमी पाटील ही नृतिका आहे. राज्यभर सध्या जत्रा, उत्सव किंवा राजकीय नेत्यांचे वाढदिवस अशा कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मागील काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील अतिशय अश्लील हावभाव करत नृत्य करत होती, तिचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यावर गौतमी पाटीलवर जोरदार टीका होऊ लागली. त्यामुळे गौतमीने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली होती. मात्र आताही गौतमी पाटील हिच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित होत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here