शिवसेनेने महाराष्ट्रात आपलं सरकार स्थापन केल्यानंतर, दुस-या राज्यांतही आपला विस्तार करायचे ठरवले. त्यासाठी शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोव्यात आपले उमेदवार उभे केले, पण उत्तर प्रदेशात नाहीच तर गोव्यातही शिवसेना अद्याप तरी एकही सीट जिंकू शकली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या या फ्लाॅप शोनंतर आता विरोधी पक्षाकडून मात्र, टीकास्त्र डागली जात आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत, शिवसेना म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा असं म्हणत खोचक टीका केली आहे.
भाजप नेते निलेश राणे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात मिळालेल्या मतदानाची टक्केवारी देत, शिवसेनेवर तोफ डागली आहे. गोव्यात शिवसेनेला ०.२५ टक्के मतदान उत्तर प्रदेश मध्ये ०. ०२ टक्के मतदान, शिवसेना म्हणजे अंगा पेक्षा भोंगा, असं ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.
गोव्यात शिवसेनेला ०.२५ टक्के मतदान
उत्तर प्रदेश मध्ये ०. ०२ टक्के मतदान,शिवसेना म्हणजे अंगा पेक्षा भोंगा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 10, 2022
( हेही वाचा डुक्कराचे हृदय मिळालेल्या व्यक्तीचा का झाला अचानक मृत्यू? )
शिवसेनेचा फ्लाॅप शो
उत्तर प्रदेशात शिवसेनेने पक्ष विस्ताराची महत्त्वाकांक्षा ठेवत, तब्बल 51 जागांवर निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेशातील चारशे जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. स्वतः संजय राऊत महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उतरले होते. मात्र, आज उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा पहिला कौल हाती येत आहे. यात भाजपाला आघाडी मिळत असून, शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community