पाण्याच्या समान वाटपाकरता सर्व पक्षीय आमदारांची बैठक बोलवा; भाजपचे महापालिका प्रशासकांना पत्र

138

मुंबई शहर व उपनगर येथे लोकसंख्या घनता आधारे समान पाणी वाटपाबाबत महानगरपालिका प्रशासक म्हणून सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्यासाठी आपण बैठक बोलावली. परंतु हा प्रश्न संपूर्ण मुंबईचा असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील सर्व आमदारांना या बैठकीत बोलवावे अशी अपेक्षा आहे. अन्यथा सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे हे उघड होईल आणि जो मुंबईसाठी उपयोगाचा नसेल असे पत्रच भाजप आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक असलेल्या इक्बाल सिंह चहल यांना लिहून आपण सत्ताधारी पक्षासाठी नसून मुंबईकरांसाठी आहात याची जाणीव करून दिली आहे.

( हेही वाचा : राज्यातील सरकारी रुग्णालयांत औषधंच नाहीत.. रुग्णांचे हाल! )

लोकसंख्या घनता आधारे पाण्याचे समान वाटप व्हावे

आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात योगेश सागर यांनी, मी सन २००० मध्ये नगरसेवक असल्यापासून सातत्याने मुंबई शहर व उपनगर येथील लोकसंख्या घनता आधारे पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी महानगरपालिका सभागृहात, स्थायी समितीच्या बैठकीत तसेच सन २००९ मध्ये आमदार झाल्यापासून विधानसभेत या गोष्टीचा सतत पाठपुरावा करीत आहे.

पण माझ्या लक्षात असे आणून देण्यात आले आहे की आपण महानगरपालिका प्रशासक या नात्याने पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या समवेत समान पाणी वाटपासाठी बैठक घेणार आहात. मुंबई महानगरपालिकेमध्ये आजही पाणी खात्यात या संदर्भात काही विषय असल्यास तेथील अधिकारी माझ्याशी माहितीची देवाण-घेवाण करीत असतात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात समान पाणी वाटपाबाबत महानगरपालिकेच्या तज्ञ समिती समोर मी माझे मत मांडले होते. या समितीने तसा अहवाल महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेला दिला होता.

( हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गावर नवी दहा स्थानके! )

पण माझ्या लक्षात आले आहे की, महानगरपालिका प्रशासक म्हणून सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्यासाठी आपण बैठक बोलवित आहात. पण याबाबत तोडगा काढण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील सर्व आमदारांना या बैठकीत बोलवावे अशी अपेक्षा आहे अन्यथा सत्ताधारी मंत्र्यांना खुश करण्याचा हा प्रशासनाचा डाव राहिल जो मुंबईसाठी उपयोगाचा नाही.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक या नात्याने माझ्या सूचनांवर विचार करून मुंबई शहर व उपनगरातील सर्व मंत्री व आमदारांना या बैठकीस निमंत्रित करावे, जेणे करून बैठक परिणामकारक होऊन मुंबई शहर व उपनगर यांना समान पाणी वाटपाबाबत निश्चित तोडगा काढता येईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.