‘स्मृती भेट’चे आयोजन!

१ मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा १ मे रोजीच साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कामगारवर्ग अग्रस्थानी होता. मुंबई शहर हे कामगार चळवळींचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते.

( हेही वाचा : खाद्यपदार्थांना महागाईचा फटका; वडापाव, समोसा,इडली, डोसा आणि चहाच्या किमतीत वाढ )

मुंबईसह महाराष्ट्र या प्रमुख मागणीसाठी हा लढा

मुंबईसह महाराष्ट्र या प्रमुख मागणीसाठी हा लढा लढला गेला. या आंदोलनात १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले होते. या आंदोलनाच्या स्मृती जतन करण्यासाठी भाजप कामगार संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन, जलतरण तलाव येथे स्मृती भेट आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सुनिल गणाचार्य, मिलिंद तुळसकर, सुहास माटे, जितेंद्र राऊत हे सुद्धा यावेळी उपस्थित असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here